आर. जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, औराळा येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले कन्नड :--आज 17 सप्टेंबर, 2022 सोमवार रोजी आर. जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, औराळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात देशभक्ती पर गीत, कवायत तसेच आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संचालक श्री. विकास जिवरख सर यांनी दीपप्रज्वलन तर पालक प्रतिनिधी श्री. सोनाजी बोरसे व श्री. सतिष बागुल यांनी सरस्वती पुजन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पालक प्रतिनिधी श्री. उध्दव बोरसे व सौ. बोरसे यांनी ध्वजपुजन करून ध्वजारोहण केले.* *यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता जिवरख मॅडम, पुजा जिवरख, आरती गायके, आकांक्षा बुरकुल, जया सपकाळ, राजेंद्र जिवरख, मुजाहीद शेख, अन्वर मण्यार, भरत साळुंके, ऋषिकेश राजपूत, संपूर्ण विद्यार्थी व पालक वर्ग यांची उपस्थिती होती.
*आर. जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, औराळा येथे स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" आज 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले* *हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे* *आचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.!!* _*अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानातून आजचे स्वातंत्र्य साकारले आहे. आपण सर्वजण त्यांचे स्मरण करुयात.*_ *आज 15 ऑगस्ट, 2022 सोमवार रोजी आर. जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, औराळा येथे देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात देशभक्ती पर गीत, नृत्य, कवायत तसेच आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुलाबराव पा. जिवरख यांनी दीपप्रज्वलन तर पालक प्रतिनिधी श्री. राजेंद्र होलप यांनी यांनी सरस्वती पुजन केले. मा.ग्रामपंचायत सदस्य श्री. कैलास बागुल यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्रजी भारतीया यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे, पालक प्रतिनिधी श्री. मोहन बोरसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे संचालक श्री. विकास जिवरख सर यांनी ध्वजपुजन तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पालक प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर गायके व सौ. ज्योती गायके यांनी ध्वजारोहण केले.* *यावेळी संपूर्ण विद्यार्थी व पालक वर्ग, गांवकरी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.* *कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता जिवरख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुजा जिवरख, ममता सपकाळ, आरती गायके, सरस्वती थोरात, आकांक्षा बुरकुल, जया सपकाळ, सानिया खान, राजेंद्र जिवरख, मुजाहीद शेख, अन्वर मण्यार, भरत साळुंके, महेश जिवरख यांनी परिश्रम घेतले.*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत सुरू असलेल्या "स्वराज्य महोत्सव" कार्यक्रमात आज दि. 14 ऑगस्ट, 2022 रविवार रोजी आर जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, औराळा या शाळेने औराळा ग्रामपंचायत व परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व अमृतमहोत्सवी वर्षाची जनजागृतीचे नियोजन करण्यात आलेले होते यामध्ये आर. जि. पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 375 फुट लांबीची तिरंगा रॅली प्रभात फेरी वाजत गाजत काढली रॅलीचा समारोप विद्यार्थ्यांच्या नृत्याने व मनोगताने झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुलाबराव पा. जिवरख, संस्थेचे संचालक श्री. विकास जिवरख सर, ग्रामविकास अधिकारी श्रीमती. गवई मॅडम, तलाठी जठार साहेब, चेअरमन श्री. रमेशकुमार खंडेलवाल, मुख्याध्यापिका सौ. गीता जिवरख मॅडम, सरपंच बागुल मॅडम, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी समस्त गांवकरी मंडळी उपस्थित होती, कार्यक्रमाठी मुख्याध्यापिका सौ. गीता जिवरख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुजा जिवरख, ममता सपकाळ, आरती गायके, सरस्वती थोरात, आकांक्षा बुरकुल, जया सपकाळ, सानिया खान, राजेंद्र जिवरख, मुजाहीद शेख, अन्वर मण्यार, भरत साळुंके यांनी परिश्रम घेतले.*